मुंबई - रिझर्व्ह बँक मंगळवारी नाणेनिधीचा द्वैमासिक आढावा सादर करणार आहे. त्यामुळे सोमवारी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला. सेन्सेक्स ६०.६८ अंकांनी घसरून २९,१२२.२७ वर, तर निफ्टी ११.५० अंकांनी घटून ८,७९७.४० वर स्थिरावला. जगातील प्रमुख बाजारातील संमिश्र कल आणि काही निवडक ब्ल्यू चिप कंपन्यांतील नफा वसुली यामुळे बाजारात घसरण दिसून आली.