आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्सचा सात महिन्यांचा नीचांक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शेअर बाजारात मंगळवारी सलग पाचव्या सत्रात घसरण दिसून आली. आयटी समभागांच्या जोरदार विक्रीने सेन्सेक्स 211 अंकांनी गडगडून 18,226.48 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातही यापेक्षा वेगळे चित्र नव्हते. निफ्टी निर्देशांक 47.85 अंकांनी घसरून 5,495.10 अंकांवर स्थिरावला.


गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीचा सर्वाधिक फटका विप्रोच्या शेअर्सना बसला. विप्रोचे समभाग 12.19 टक्क्यांनी घसरले. विप्रोने त्यांचा आयटीव्यतिरिक्त इतर तीन भागांचा व्यवहार खासगी कंपनीकडे दिल्याचा परिणाम विप्रोच्या
शेअर्सवर झाला. आयटीशिवाय रिफायनरी, सार्वजनिक उद्योग, एफएमसीजी आणि रिअ‍ॅल्टी क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची जोरदार विक्री झाली. राष्ट्रीय शेअर बाजारातही विक्रीचा जोर होता. त्यामुळे निफ्टी 5,495.10 या पातळीपर्यंत घसरला. 13 सप्टेंबर 2012 नंतरची ही निफ्टीची नीचांकी पातळी आहे. शेअर बाजारातील 13 पैकी 12 क्षेत्रीय निर्देशांकांत घसरण दिसून आली.


आशियातील बहुतेक बाजारांत तेजीचे वातावरण होते. चीन, हाँगकाँग, सिंगापूर आणि द. कोरियाचे बाजार 0.11 ते 0.70 टक्क्यांनी वधारले. जपानचा निक्की निर्देशांक स्थिर राहिला. युरोपातील बाजारातही सकारात्मक वातावरण दिसून आले. फ्रान्स, जर्मनी आणि लंडन बाजार 0.33 ते 0.49 टक्क्यांनी वधारले.