आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच सत्रांत सेन्सेक्स ११२०.९७ अंकांनी आपटला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रुपयाचे अवमूल्यन, भांडवलाचा आटलेला ओघ यामुळे वाहन, बहुराष्ट्रीय कंपन्या, औषध समभागांची तुफान विक्री होऊन सेन्सेक्स सलग दुस-या दिवशी ७१ अंकांनी घसरला. गेल्या पाच दिवसांपासून बाजारात घसरणीचा सूर कायम आहे.

जागतिक बाजारातील नरमाईच्या पार्श्वभूमीवर बाजारात विक्रीचे वातावरण असल्याने निर्देशांक २६,७२४.०१ अंकांच्या खालच्या पातळीवर उघडला. परंतु नंतर मात्र सेन्सेक्समध्ये सुधारणा झाली. काही बड्या समभागांच्या खरेदीमुळे सेन्सेक्स २६,८७१.९१ अंकांच्या कमाल पातळीवर गेला. परंतु सेन्सेक्सच्या प्रत्येक वाढीवर विक्रीचा मारा झाल्यामुळे ही कमाल पातळी कायम राहू शकली नाही. सेन्सेक्स दिवसअखेर ७१.३१ अंकांनी घसरून २६,७१०.१३ अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या पाच सत्रांमध्ये सेन्सेक्स ११२०.९७ अंकांनी घसरला आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक ८ हजार अंकांच्या खाली गेला. निफ्टी दिवसअखेर ३७.८० अंकांनी घसरून ८०२९.८० अंकांच्या पातळीवर बंद झाला.

वाढलेली व्यापार तूट आणि रुपयाने मधल्या सत्रात गेल्या १३ महिन्यांचा गाठलेला नवा नीचांक याचा बाजारावर नकारात्मक परिणाम झाला आहे.