आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौफेर विक्रीच्या मा-याने सेन्सेक्सची 286 अंकांनी घसरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कच्च्या तेलाचा भडका, जागतिक बाजारातील नरमाई, रुपयाची घसरण आणि कॉर्पोरेट्सबरोबर व्यवहार करण्याच्या दृष्टीने बॅँकांसाठी झालेला मसुदा अशा नकारात्मक वातावरणाचा परिणाम होऊन शेअर बाजारात झालेल्या चौफेर विक्रीच्या मा-यात सेन्सेक्स 286 अंकांनी आपटला. तुफान विक्रीच्या मा-यात स्थावर मालमत्ता, धातू, सार्वजनिक कंपन्या, ग्राहकोपयोगी वस्तू , ऊर्जा आदी क्षेत्रांसह जवळपास पंधराशे समभागांची किंमत कोसळून गुंतवणूकदार 1.1 लाख कोटी रुपयांनी कंगाल झाले.


जागतिक शेअर बाजारातील नरमाईमुळे गुंतवणूकदार अगोदरच चिंताक्रांत झालेले असतानाच चीनची आर्थिक वाढ, इजिप्तमधील पेचप्रसंग, पोर्तुगालमधील राजकीय अस्थिरता आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ या सगळ्या नकारात्मक घडमोडींची भर त्यात पडली. परिणामी बाजारातील विक्रीला लगाम बसू शकला नाही. निर्देशांक सकाळी काहीसा खालच्या पातळीवर उघडला. दिवसभर तणाव कायम राहून शेवटी सेन्सेक्स 286.06 अंकांनी घसरून 19,177.76 वर बंद झाला. राष्‍ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील 5800 अंकांच्या पातळीखाली घसरला. निफ्टी 86.50 अंकांनी घसरून दिवसअखेर 5770.90 वर बंद झाला.


रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाने कंपन्यांबरोबर व्यवहार करताना भांडवली गरजांसाठी वाढीव तरतूद करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे बॅँकांच्या समभागांवर ताण येऊन त्याचा फटका स्टेट बॅँक, आयसीआयसीआय बॅँक, एचडीएफसी बॅँक यांना फटका बसला. चीनच्या आर्थिक वाढीच्या चिंतेमुळे हिंदाल्को, टाटा स्टीलसारख्या धातू कंपन्याच्या समभागांना झळ लागली.


टॉप गेनर्स
रिलायन्स, डॉ. रेड्डी लॅब, हीरो मोटोकॉर्प, आयसीआयसीआय बॅँक, गेल इंडिया, बजाज ऑटो, मारुती सुझुकी, एनटीपीसी, एचडीएफसी बॅँक, टीसीएस


टॉप लुझर्स
टाटा पॉवर, स्टेट बॅँक, स्टर्लाइट इंड, टाटा स्टील, हिंदाल्को, ओएनजीसी, भेल, भारती एअरटेल, विप्रो, एचडीएफसी, एल अ‍ॅँड टी.