आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sensex Come Down By 36 Number, Market Eye On Federal

सेन्सेक्स 36 अंकांनी घसरला,बाजाराची नजर फेडरलकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अमेरिकेत फेडरल रिझर्व्हची बैठक सुरू असून त्यात रोखे खरेदी कपातीबाबत काय निर्णय होतो याकडे शेअर बाजाराचे लक्ष आहे. त्यामुळे बुधवारी बाजारात गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने सेन्सेक्स 36.21 अंकांनी घसरुन 20,647.30 वर आला. निफ्टी सहा अंकांच्या किरकोळ घसरणीसह 6120.25 वर स्थिरावला.
बाजारातील दिग्गज समभागांची विक्री करण्यावर गुंतवणूकदारांचा भर दिसला. टाटा स्टील, सेसा स्टरलाइट, हिंदाल्को, रिलायन्स इंडस्ट्रीज या समभागांना विक्रीचा फटका बसला. मारूती, सन फार्मा, भेल आणि हीरो मोटोकॉर्प या समभागांची चांगली खरेदी झाली.