मुंबई - जागितक शेअर बाजारातील संमिश्र वातावरण, कंपन्यांच्या दुस-या तिमाही निकालांच्या अगोदर किरकोळ गुंतवणूकदारांनी आटोक्यात ठेवलेले व्यवहार आणि भांडवल बाजारातून बाहेर जात असलेला निधी या गोष्टींमुळे बाजाराचा मूड गेला. दीर्घ सुटीनंतरच्या सौदापूर्ती सप्ताहाच्या पहिल्या दिवशी झालेल्या विक्रीच्या मा-यात सेन्सेक्स २९६.०२ अंकांनी गडगडून २६,२७१.९७ अंकांच्या दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला.
गांधी जयंती, दसरा, बकरी ईद अशा लागून सुट्या आल्यामुळे बाजाराचे कामकाज बंद होते. निफ्टी निर्देशांक ९३.१५ अंकांनी घसरून तो ७८५२.४० अंकांच्या पातळीवर बंद झाला.