आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sensex Come Down Due To Estimating Low Development Rate

विकास दर कमी राहण्‍याच्या अंदाजामुळे निर्देशांकात घसरण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रिझर्व्ह बँकेने प्रमुख व्याजदरात मंगळवारी कपात केली. त्याला सलामी ठोकत सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने 100 अंकांची कमाई केली. मात्र, नफेखोरी तसेच आरबीआयने विकास दराचा अंदाज घटवल्याने दुपारच्या सत्रात जोरदार विक्री झाली आणि सेन्सेक्स 112.45 अंकांनी घसरून 19,990.90 या पातळीवर बंद झाला. व्याजदराशी निगडित रिअ‍ॅल्टी, ऑ टो आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांची विक्री करण्यावर गुंतवणूकदारांनी भर दिला. त्यामुळे सकाळच्या सत्रातील तेजी नफेखोरीमुळे वाहून गेली.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) तिस-या तिमाहीतील पतधोरण जाहीर केले. त्याचे पडसाद दलाल स्ट्रीटवर उमटले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 24.90 अंकांनी घसरून 6,049.90 अंकांवर बंद झाला.

टॉप लुझर्स
हिंदाल्को, बजाज ऑटो, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल,भेल, गेल इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील, टाटा मोटर्स, विप्रो, एसबीआय, सन फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा.

अनेक घटकांचा परिणाम
आरबीआयच्या कपात धोरणाला बाजाराने सलामी दिली असली तरी बाजारात अनेक घटकांचा परिणाम दिसून आला. परिणामी बाजार गडगडला.
आनंद राठी, चेअरमन, आनंद राठी फायनान्शियल सर्व्हिसेस