आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजारातील तेजीला ओहोटी, सेन्सेक्स 20 हजाराच्या खाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एफएमसीजी क्षेत्रातील आयटीसी आणि हिंदुस्तान लिव्हर या कंपन्यांच्या जून तिमाहीतील खराब कामगिरीचा परिणाम शेअर बाजारावर दिसला. सेन्सेक्स 20 हजारांच्या पार गेलेल्या तेजीच्या वारूला या निकालांनी ओहोटी लागली. जोरदार विक्रीमुळे सेन्सेक्स 286 अंकांनी घसरून 19804.76 वर बंद झाला, तर निफ्टी 83 अंकांच्या घटीसह 5907.50 वर स्थिरावला.

डेरिव्हेटिव्ह सौदापूर्तीचा गुरुवार अखेरचा दिवस असल्याने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला. जगातील प्रमुख बाजारांतही नकारात्मक कल दिसला. त्यामुळेही बाजारातील घसरणीला वेग आला. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 25 समभागांत घसरण दिसून आली. तिमाही निकालाचा फटका हिंदुस्तान लिव्हर आणि आयटीसी कंपन्यांना बसला. रिलायन्स, सन फार्मा, एचडीएफसी बँक, एल अँड टी, विप्रो, महिंद्रा या कंपन्यांना विक्रीचा फटका बसला. अँड महिंद्रा, ओएनजीसी, टाटा पॉवर, टाटा स्टील, भेल, डॉ. रेड्डीज लॅब, सिप्ला, स्टरलाइट इंडस्ट्रीज, कोल इंडिया, जिंदाल स्टील आणि हिंदाल्को या कंपन्यांना विक्रीचा फटका बसला. हीरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, टीसीएस आणि इन्फोसिस या समभागांनी चांगली कमाई केली.