आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजाराच्या तेजीला अबकारी शुल्क वाढीचा चटका, सेन्सेक्स विक्रमी पातळीवरून गडगडला.

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पेट्राेल, डिझेल स्वस्त झाल्याचा आनंद कायम राहताे न राहताे ताेच सरकारने या दाेन्ही इंधनांवरील अबकारी शुल्कात सहा टक्क्यांनी वाढ केल्याचा फटका बाजाराला सहन झाला नाही. त्यामुळे तीन दिवसांपासून बाजारात अालेल्या तेजीला लगाम बसून सेन्सेक्स ६८ अंकांनी घसरून विक्रमी पातळीवरून गडगडला.
तीन दिवसांपासून बाजारात तेजी असल्यामुळे सकाळच्या सत्रात सेन्सेक्स भक्कम पातळीवर उघडला. महागाई आणि आैद्याेगिक उत्पादनाची बुधवारी जाहीर झालेली आकडेवारी सकारात्मक असल्याने त्या बळावर सेन्सेक्सने दिवसभरात २८,०९८.७४ अंकांची कमाल पातळी गाठली हाेती. खरेदीने जाेर पकडलेला असतानाच केंद्र सरकारने पेट्राेल आणि िडझेलवरील अबकारी शुल्कात वाढ करण्याचा घेतलेला निर्णय मात्र बाजाराच्या पचनी पडला नाही. नाराज झालेल्या गुंतवणूकदारांनी केलेल्या नफेखाेरीमुळे सेन्सेक्स २८ हजारांच्या िवक्रमी पातळीवरून गडगडत २७,८२२.१० अंकांच्या नीचांकी पातळीवर आला. शेवटी सेन्सेक्स ६८.२६ अंकांनी घसरून २७,९४०.६४ अंकांच्या पातळीवर बंद झाला. विदेशी निधीचा सातत्याने आेघ बाजारात येत असल्याने बुधवारी २८,००८.९० अंकांचे िशखर सर करून सेन्सेक्स िवक्रमादित्य झाला हाेता. राष्ट्रीय बाजारपेठेतील निफ्टीचा निर्देशांक २५.४५ अंकांनी घसरून ८३५७.८५ अंकांच्या पातळीवर बंद झाला. देशाच्या आैद्याेगिक उत्पादनात सप्टेंबरमध्ये झालेली २.५ टक्क्यांनी वाढ आणि किरकाेळ महागाई घसरून आॅक्टाेबरमध्ये ५.५२ टक्क्यांवर आल्यामुळे बाजाराला माेठा दिलासा मिळाला हाेता.