आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स २९ हजारांवर, निफ्टी ८८०० च्या पार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आगामी अर्थसंकल्पातील सकारात्मक प्रस्तावित सुधारणा, जगातील प्रमुख शेअर बाजारांतील सकारात्मक कल आणि एसबीआयची तिमाहीतील चांगली कामगिरी यामुळे शेअर बाजारात शुक्रवारी जोरदार तेजी आली. चांगल्या खरेदीमुळे सेन्सेक्स २८९.८३ अंकांच्या वाढीसह २९,०९४.९३ वर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९३.९५ अंकांच्या कमाईसह ८,८०५.५० या महत्त्वाच्या पातळीपार गेला.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धबंदीचे संकेत मिळाल्याने जगभरातील बाजारात सकारात्मक कल दिसून आला. त्यातच एसबीआयने डिसेंबर तिमाहीत केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह दुणावला. त्यांनी भरभरून खरेदी केल्याने शेअर बाजारात सलग चौथ्या सत्रात वाढ नोंदवली. बँकिंग, वाहन ,धातू समभागांची खरेदी झाली.
टॉप गेनर्स : एसबीआय, महिंद्रा अँड महिंद्रा, टीसीएस, कोल इंडिया, आयटीसी, विप्रो, सन फार्मा, मारुती-सुझुकी, हीरो मोटोकॉर्प, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी.
टॉप लुझर्स : गेल इंडिया, भेल, ओएनजीसी, एचडीएफसी बँक.