आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देशांकाचे दमदार शतक ; तेजीचे वारे कायम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भांडवल बाजारात पुन्हा एकदा तेजीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारच्या 265 अंकांच्या भक्कम उसळीनंतर दुस-या दिवशी बाजारातील खरेदीचे वातावरण तापले होते. जागतिक शेअर बाजारातील भक्कम वातावरणामुळे स्थावर मालमत्ता, भांडवली वस्तू, धातू आणि माहिती तंत्रज्ञान समभागांच्या दणक्यात झालेल्या खरेदीत सेन्सेक्सने शतक ठोकत 19,252.61 अंकांच्या गेल्या आठवडाभरातील उच्चांकी बंद पातळीची नोंद केली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक मंगळवारच्या उसळीनंतर सकाळच्या सत्रातही कमाल पातळीवर उघडला आणि दिवसभरात हा पारा चढतच राहिला. दिवसअखेर सेन्सेक्स 109.44 अंकांची वाढ नोंदवत 19,252.61 अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्‍ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 34.35 अंकांनी वाढून 5,800 अंकांच्या पातळीवर म्हणजे 5818.60 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

अमेरिकेतील अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याचे संकेत मिळाल्याने वॉलस्ट्रीट शेअर बाजारात चांगली वाढ झाली होती. त्याचा परिणाम म्हणून आशिया, युरोप शेअर बाजारात आलेल्या तेजीचा बाजारावर सकारात्मक परिणाम झाला.
व्याजदर संवेदनशील समभागांना मागणी
पुढच्या महिन्यात रिझर्व्ह बँक व्याजदर कपात करण्याच्या आशा आता चांगल्याच उंचावल्या आहेत. त्यामुळे बाजारात सध्या व्याजदर संवेदनशील समभागांना चांगली मागणी आली. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने माहिती तंत्रज्ञान समभागांनी देखील लक्ष वेधून घेतले.
टॉप गेनर्स : स्टर्लाइट इंडस्ट्रीज, हिंदाल्को, टाटा मोटर्स. एल अँड टी, टाटा स्टील, भेल, विप्रो, स्टेट बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, रिलायन्स.
टॉप लुझर्स महिंद्रा अँड महिंद्रा, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी, मारुती.