आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देशांकाची वारी 20 हजारावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून सातत्याने सुरू असलेली खरेदी आणि त्यातच एचडीएफसीच्या तिमाहीतील अनपेक्षित चांगल्या आर्थिक निकालामुळे बाजारात उत्साहाचे वारे संचारले. या उत्साहात झालेल्या जोरदार खरेदीत सेन्सेक्सने तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच 20 हजाराचे शिखर सर केले.


निफ्टीनेही 6 हजार अंकांची पातळी ओलांडली. परंतु शेअर बाजाराचे कामकाज संपण्याचा घंटानाद होण्याच्या अवघ्या काही मिनिटे अगोदर सेन्सेक्सची पातळी घसरली. दिवसभर जवळपास सर्वच सत्रात सेन्सेक्स 20 हजार अंकांच्या पातळीवर होता. परंतु दिवस अखेर सेन्सेक्सने 101.23 अंकांची वाढ नोंदवत 19,990.18 अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या चार सत्रात सेन्सेक्सने 410 अंकांची कमाई केली. 31 जानेवारीनंतर सेन्सेक्स पहिल्यांदाच 20 हजारावर गेला पण तो त्या पातळीवर राहू शकला नाही. राष्‍ट्रीय बाजारातील निफ्टी 25.75 अंकांनी वाढून 6069.30 अंकांवर बंद झाला. बाजारात दिवसभरात झालेल्या खरेदीत प्रामुख्याने बड्या समभागांना मागणी आल आणि 975 समभागांना फायदा तर 974 समभागांना तोटा सहन करावा लागला.