आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देशांक वीस हजारांपल्याड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - औद्योगिक उत्पादनवृद्धीच्या आकडेवारीने उत्साहित झालेल्या सेन्सेक्समध्ये शुक्रवारी 143.58 अंकांची तेजी येत तो 20,082.62 अंकांवर बंद झाला. वाहन, ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू आणि बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदीचा जोर राहिला. राष्ट्रीय शेअर बाजारचा निफ्टी निर्देशांक 44.60 अंकांनी वधारून 6094.75 अंकांवर बंद झाला.
विदेशी गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे सेन्सेक्स 30 जानेवारीनंतर पहिल्यांदाच 20 हजारांपेक्षा अधिक अंकांवर बंद झाला. आआयपीनंतर सेन्सेक्सने एकवेळ 20,119.14 अंकांचा पल्ला गाठला होता. निफ्टीनेही यंदाच्या कॅलेंडर वर्षातील 6094.75 अंकांची सर्वोच्च पातळी गाठली. बीएसईत मारुती सुझुकी, आयटीसी लिमिटेड, बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, हिंदाल्को आणि आयसीआयसीआय बँकेसह एकूण 18 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ नोंदवण्यात आली.