आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्सचे शतक, सोने झळाळले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बाजार नियामक सेबी व रिझर्व्ह बँकेने उचलेल्या पावलामुळे एकसष्टीच्या घरात गेलेल्या रुपयाची घसरण थोपवली. रुपया सुधारल्याने शेअर बाजार तसेच सराफा बाजारात तेजी परतली. मंगळवारी सेन्सेक्सने निर्देशांकाने 114.71 अंकांच्या कमाईसह 19,439.48 पातळी गाठली. निफ्टी 47.45 अंकांच्या वाढीसह 5859.00 वर स्थिरावला.


एचडीएफसी बँक, सन फार्मा, एल अँड टी, इन्फोसिस, रिलायन्स, एचडीएफसी, बजाज ऑटो, डॉ. रेड्डीज लॅब आणि भेल या समभागातील खरेदीने तेजीला बळ दिले. दरम्यान, सेबी आणि रिझर्व्ह बँकेने मंगळवारी आणखी पावले टाकत डॉलरची घोडदौड रोखली. सेबीने मोठ्या प्रमाणातील सौद्यांना आळा बसण्यासाठी ब्रोकर्स आणि करन्सी डेरिव्हेटिव्हवर बंधने लादली. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाने 47 पैशांची कमाई करत 60.14 ही पातळी नोंदवली. रुपया सुधारल्याने सराफा बाजारात तेजी आली. सोन्याची किंमत तोळ्यामागे 280 रुपयांनी वाढून 26,830 रुपये झाली.