आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारावर 'आप'बीती; सेन्सेक्स ४९० अंकांनी कोसळला, निफ्टी ८५५० च्या खाली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आठवडाभरापासून घसरणीच्या वाटेवर असलेल्या शेअर बाजाराला सोमवारी दिल्लीतील भाजपच्या पीछेहाटीचे कारण मिळाले. दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल मंगळवारी जाहीर होणार आहेत. तत्पूर्वी आलेल्या निकालपूर्व सर्वेक्षणात आप पक्ष मुसंडी मारत असल्याचे चित्र समोर आल्याने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी विक्रीचा धडाका लावला. त्यामुळे सेन्सेक्स ४९०.५२ अंकांनी कोसळून २८,२२७.३९ वर आला. निफ्टीने १३४.७० अंकांच्या घसरगुंडीने ८,५२६.२५ पर्यंत खाली आला. निफ्टीने महत्त्वाची ८,५५० पातळी सोडली, तर सेन्सेक्सने तीन आठवड्यांचा नीचांक नोंदवला.

दिल्लीतील निवडणुकांचे निकाल, प्रमुख कंपन्यांची तिमाहीतील अपेक्षेनुसार न झालेली कामगिरी, अमेरिका फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढीचे िदलेले संकेत या सर्वांचा एकत्रित परिणाम बाजारावर दिसून आला. भांडवली वस्तू, धातू, वाहन, बँक, ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू, एफएमसीजी आणि तेल रिफायनरी कंपन्यांच्या समभागांची जोरदार विक्री झाली. डिसेंबर तिमाहीतील कंपन्यांच्या खराब कामगिरीमुळे नाराज झालेल्या गुंतवणूकदारांनी जीडीपी आकडेवारी जाहीर होण्यापूर्वी आपली नाराजी विक्रीतून व्यक्त केल्याचे दलालांनी सांगितले.

एक्झिट पोलचा परिणाम
एक्झिट पोलमध्ये दिल्लीत आपचे सरकार येणार असल्याचे चित्र आहे. त्यातच अपेक्षेप्रमाणे नसणारे तिमाही निकाल, जगभरातील संमिश्र कल, नफेखोरी याचा एकत्रित परिणामाने बाजारात घसरगुंडी आली.
राकेश गोयल, वरिष्ठ उपाध्यक्ष, बोनान्झा पोर्टफोलिओ.

मिड कॅपला विक्रीचा तडाखा
मागील काही महिन्यांपासून गुंतवणूकदारांच्या उड्या पडत असलेल्या मिड व स्मॉल कॅप कंपन्यांच्या समभागांची जोरदार विक्री होत आहे. त्याचा फटका या समभागांना बसला. स्मॉल कॅप निर्देशांक १.५० टक्के, तर मिड कॅप निर्देशांक १.४१ टक्क्यांनी घसरला.

फटका बसलेले शेअर्स
टाटा स्टील, गेल, सेसा स्टरलाइट, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, आयटीसी आणि टाटा मोटर्स

एफआयआयकडून विक्री
देशातील राजकारण, अमेरिकेतील रोजगारवाढ, चीनमधील स्थिती यावर बारकाईने लक्ष ठेवून असलेल्या विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी मागील सात दिवसांपासून भारतीय शेअर बाजारातून निधीचा उपसा सुरूच ठेवला आहे.