Home | Business | Share Market | sensex down

सेन्सेक्सची सलग तिस-या दिवशीही घसरगुंडी

प्रतिनिधी | Update - Jun 11, 2011, 04:00 AM IST

एप्रिल महिन्यामध्ये देशाच्या औद्योगिक उत्पादनात मार्च महिन्यातील केवळ ६.३ टक्के वाढ

  • sensex down

    मुंबई- जागतिक बाजारपेठेतील मरगळीचे वातावरण आणि त्यातच मंदावलेला औद्योगिक विकासदर यामुळे हताश झालेल्या गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीच्या मा-यात सेन्सेक्स सलग तिस-या दिवशी ११६ अंकांनी घसरला.

    एप्रिल महिन्यामध्ये देशाच्या औद्योगिक उत्पादनात मार्च महिन्यातील केवळ ६.३ टक्के वाढ झालेली असून त्यामुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावण्याची भीती बाजाराला वाटत आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी रिझर्व्ह बॅँक पुढील आठवड्यामध्ये व्याजदरांत वाढ करण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे बाजारात झालेल्या विक्रीच्या मा-यामध्ये सेन्सेक्स ११६ अंकांनी घसरून १८,२६९ अंकांवर बंद झाला. त्या अगोदर सेन्सेक्सने १८,१८३ अंकांची निचांकाची पातळी गाठली होती. राष्टÑीय शेअर बाजारातील निफ्टीच्या निर्देशांकानेही ५४५७ अंकांची निचांकी पातळी गाठल्यानंतर दिवसअखेर ३५ अंकांनी घसरून ५४५७ अंकांवर बंद झाला. बाजारातील विक्रीच्या तडाख्याचा सर्वात जास्त फटका भांडवली वस्तू समभागांना बसला, परंतु यंदा चांगला पाऊस पडणार असल्यामुळे ग्राहकोपयोगी वस्तूंची मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी या कंपन्यांच्या समभागांची चांगली खरेदी केली. मल्टी ब्रॅँड रिटेल क्षेत्रात विदेशी थेट गुंतवणुकीला परवानगी देण्याचा प्रस्ताव पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळ समितीकडे विचारार्थ येईल असा अंदाज आहे. त्यामुळे रिटेल कंपन्यांच्या समभागांनी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले.

Trending