आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्सचा पाच आठवड्यांचा नीचांक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डॉलरच्या तुलनेत रुपयाने गाठलेली 57 ची पातळी आणि रिलायन्सकडून 4-जी बाबत ठोस घोषणा न झाल्याने गुंतवणूकदार निराश झाले. त्याचे पडसाद मुंबई शेअर बाजारा उमटले. सेन्सेक्स 48.73 अंकांनी गडगडून 19,519.49 पातळीवर बंद झाला. निफ्टीही किरकोळ घसरणीसह 5,921.40 वर स्थिरावला.
सेन्सेक्समधील रिलायन्ससह एचडीएफसी बँक, भारती एअरटेल आणि सन फार्मा या समभागांना विक्रीचा फटका बसला. बुधवारी 3 टक्क्यांची कमाई करणार्‍या रिलायन्सच्या समभागात गुरुवारी 1.03 टक्के घसरण दिसून आली. बँक, रिअ‍ॅल्टी आणि भांडवली वस्तू कंपन्यांच्या समभागाची काही प्रमाणात विक्री झाली. आशियातील प्रमुख बाजारात घसरणीचा कल होता. अमेरिकेतील रोजगार आणि कंपन्यांची आकडेवारी अपेक्षित न आल्याने वॉल स्ट्रीटवरही घसरण दिसून आली. त्यामानाने युरोपातील प्रमुख शेअर बाजारात मात्र बºयापैकी तेजीचे वातावरण होते. इंग्लंड,जर्मनी आणि फ्रान्समधील बाजारात 0.11 टक्के ते 0.33 टक्के तेजी दिसून. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 19 कंपन्यांचे समभाग घसरले, तर 10 कंपन्यांचे समभाग वधारले.
दिवसभरातील चार्टवर नजर टाकल्यास मंदीचा कल दिसून येतो. निफ्टीला 6000 पातळीवर अडथळा तर 5830 पातळीवर आधार आहे. असे मत इन्व्हेंचर ग्रोथ अँड सेक्युरिटीजचे सीएमडी नागजी के. रिटा यांनी व्यक्त केले.

घसरणीचा फटका
भारती एअरटेल, सन फार्मा, एनटीपीसी, इन्फोसिस, टाटा स्टील, हीरो मोटोकॉर्प, भेल, डॉ. रेड्डीज लॅब, स्टर्लाइट, गेल इंडिया
टॉप गेनर्स
आयसीआयसीआय बँक, विप्रो, मारुती सुझुकी, एसबीआय