आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sensex Down Over 150 Points News In Divya Marathi

सेन्सेक्स गडगडला; तीन महिन्यांचा नीचांक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - व्याजदर कपातीची मावळलेली आशा, बाजारातून बाहेर चाललेला निधीचा ओघ, सर्वसाधारणपेक्षा कमी पाऊस होण्याचा हवामान खात्याचा अंदाज या सगळ्या नकारात्मक घडामोडींचा गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम झाला. नकारात्मक बातम्यांनी वैतागलेल्या गुंतवणूकदारांनी बाजारात केलेल्या तुफान विक्रीच्या मार्‍यात माहिती तंत्रज्ञान आणि भांडवली वस्तू समभागांना तुफान फटका बसून सेन्सेक्स 208 अंकांनी गडगडत 22,277.23 अंकांच्या तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला.

तोंडावर आलेल्या निवडणुका आणि कंपन्यांच्या आर्थिक निकालाचा मोसम लक्षात घेता अलीकडे बाजारात येऊन गेलेल्या तेजीनंतर आता चढ-उतार दिसणार असून नफारूपी कमाई आणि विक्रीचा ताण आणखी काही काळ कायम राहण्याचा अंदाज बोनान्झा पोर्टफोलिओचे वरिष्ठ संशोधक विश्लेषक निधी सारस्वत यांनी व्यक्त केला. परंतु नंतर झालेल्या नफारूपी विक्रीमुळे सेन्सेक्स दिवसअखेर 207.70 अंकांनी घसरून 22,277.23 अंकाच्या पातळीवर बंद झाला. सलग तिसर्‍या दिवशी सेन्सेक्सने घसरणीचा सूर लावला आहे. निफ्टी 57.80 अंकांनी घसरून 6675.30 अंकांच्या पातळीवर बंद झाला. एका खासगी संस्थेने जून ते सप्टेंबर या कालावधीत कमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केल्याचा नकारात्मक परिणाम बाजारावर झाला.

‘आयटी’ समभागांना फटका
इन्फोसिस या आघाडीच्या कंपनीने पुढील आर्थिक वर्षासाठी महसुलाचा निराशाजनक अंदाज व्यक्त केल्याचा नकारात्मक परिणाम आयटी समभागांवर झाला. त्यामुळे टीसीएसच्या चौथ्या तिमाहीतील निकालांच्या अगोदरच झालेल्या विक्रीच्या मार्‍यात टीसीएस, अ‍ॅसेंट, विप्रो या सर्व तीन बड्या आयटी कंपन्यांना धक्का बसला.