आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sensex Ends Flat, Nifty Climbs To Fresh High News In Marathi

रुपया, निफ्टीचा उच्चंक, सेन्सेक्स स्थिर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रुपयाने डॉलरची यथेच्छ धुलाई करत मंगळवारी आणखी एक उच्चांक गाठला. सोमवारी सहा महिन्यांतील उच्चांकी स्तर गाठणार्‍या रुपयाने मंगळवारी डॉलरच्या तुलनेत 29 पैशांची कमाई करत 60.48 या पातळीपर्यंत मजल मारली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सोमवारी विक्रमी पातळीवर बंद झाला होता. मंगळवारी शेअर बाजारात मोठे चढउतार दिसून आले. सत्राअखेर सेन्सेक्स 0.27 अंकांच्या घटीसह 22,055.21 वर बंद झाला. निफ्टी मात्र 6.25 अंकांच्या वाढीसह 6589.75 या आजवरच्या सर्वोच्च पातळीवर बंद झाला.

मुंबई शेअर बाजारात सकाळच्या सत्रात नफेखोरी मोठ्या प्रमाणात दिसून आली. नैसर्गिक वायूच्या किंमतवाढीला स्थगिती मिळाल्याचा दबाव बाजारावर दिसून आला. बँका, ऊर्जा, भांडवली वस्तू, ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू या कंपन्यांच्या समभागांची खरेदी दिसून आली, तर रिफायनरी समभागांची विक्री झाली. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग 2.87 टक्क्यांनी घसरून 878.65 रुपयांवर आला. आशियातील बहुतेक शेअर बाजारांत घसरण तर युरोपातील बाजारांत वधारणेचे चित्र होते. सिंगापूर, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरियाचे बाजार घसरले, तर जर्मनी, ब्रिटन आणि फ्रान्सचे बाजार वधारले.