आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेन्सेक्सचा उच्चंक, रुपयाचा नीचांक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डॉलरच्या तुलनेत बुधवारी रुपयाने नवी नीचांक गाठला. डॉलरला आलेल्या मोठ्या मागणीमुळे रुपयाने 24 पैसे गमावत 61.43 ही विक्रमी नीचांकी पातळी गाठली. महागाईने पाच महिन्यांचा उच्चांक गाठला. मात्र, शेअर बाजाराने याकडे दुर्लक्ष करत तेजीचा सिलसिला कायम ठेवला. दिवसअखेर सेन्सेक्स 137.75 अंकांच्या कमाईसह 19,367.59 वर बंद झाला. हा दोन आठवड्यांचा उच्चांक आहे.

निफ्टी 43 अंकांच्या वाढीसह 5,742.30 वर पोहोचला.
टाटा मोटर्स, हिंदाल्को आणि ओएनजीसी या समभागातील तेजीने सेन्सेक्सला वाढीचे बळ दिले. दिवसभर बाजारात खरेदी-विक्रीचा सी-सॉ रंगला.

तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील कंपनीच्या समभागांचीही चांगली खरेदी झाली. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 18 समभागांत तेजी दिसून आली. आशियातील बाजारात संमिश्र तर युरोपातील बाजारात प्रारंभी तेजीचा कल दिसून आला.
तेजीचे मानकरी : टाटा मोटर्स, हिंदाल्को, ओएनजीसी, गेल इंडिया, टाटा स्टील, बजाज ऑटो

महागाईने वांधा
जुलैमध्ये महागाईने पाच महिन्यांचा उच्चांक गाठल्याने रिझर्व्ह बँकेच्या धोरणावर परिणाम होऊ शकतो. महागाईमुळे आशेवर पाणी पडले आहे. - इंद्रनील पान, चीफ इकॉनॉमिस्ट, कोटक महिंद्रा बँक

सोने घसरले
तेजीवर स्वार असलेला सोन्याच्या तेजीचा वारू बुधवारी घसरणीला अडकला. राजधानीतील सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 125 रुपयांनी घसरून 29,700 झाले. चांदी किलोमागे 85 रुपयांनी वाढून 46,050 झाली.