आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sensex Falls By 86 Points Ahead Of Industry Data

सेन्सेक्स घसरला, औद्योगिक उत्पादनाची नकारघंटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ऑटो, रिफायनरी आणि बँकिंग समभागांत जोरदार नफावसुली झाल्याने शुक्रवारी सेन्सेक्स 86.37 अंकांनी घसरून 22,628.96, तर निफ्टी 20.10 अंकांनी घटून 6776.30 वर स्थिरावला. औद्योगिक उत्पादन फेब्रुवारीमध्ये पुन्हा नकारात्मक पातळीवर आले आहे. उच्चांकावर असलेल्या बाजारात गुंतवणूकदारांनी नफा वसुलीला प्राधान्य दिल्याचे दिसले. औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) म्हणून ओळखण्यात येणारा हा निर्देशांक घसरून वजा 1.9 पातळीत आला आहे. भांडवली वस्तू, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राच्या खराब कामगिरीचा फटका निर्देशांकाला बसला.