आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sensex Falls Over 100 Points; Rate Sensitive Shares Slump

बाजारात विक्रीला ऊत ; सेन्सेक्स, निफ्टी घसरले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - घाऊक महागाई निर्देशांकाने तीन महिन्यांचा उच्चांक गाठल्याने गुंतवणूकदार धास्तावले. रिझर्व्ह बँकेकडून आता व्याजदर कपातीच्या आशा धूसर झाल्याने गुंतवणूकदारांनी नफा वसुली करणे पसंत केल्याने मंगळवारी शेअर बाजारात विक्रीला ऊत आला होता. त्यामुळे सेन्सेक्स 144.03 अंकांनी गडगडून 22,484.93 वर बंद झाला, तर निफ्टी 43.20 अंकांनी घसरून 6,733.10 स्थिरावला. इन्फोसिसच्या चांगल्या निकालाकडेही बाजाराने दुर्लक्ष करत नफेखोरीला प्राधान्य दिले.

सकाळच्या सत्रात इन्फोसिसच्या आर्थिक निकालामुळे बाजारात सकारात्मक वातावरण होते. मात्र, घाऊक महागाईची आकडेवारी जाहीर झाली आणि बाजाराचा नूर बदलला. व्याजदर कपातीच्या आशा धूसर झाल्याने गुंतवणूकदारांनी व्याजदराशी निगडित समभागांची विक्री करण्यावर भर दिला. ब्रोकर्सना सांगितले, महागाईचा चढता आलेख, त्यातच औद्योगिक उत्पादनाची नकारात्मक चाल आणि चीनमधील आर्थिक वाढीचा उतरता आलेख यामुळे बाजारात विक्रीचा दबाव दिसून आला.

सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 20 समभाग घसरले. एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी आदी बँकांसह मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, भेल, आयटीसी आदी समभागांना विक्रीचा फटका बसला. इन्फोसिसच्या चांगल्या कामगिरीमुळे आयटी क्षेत्रातील समभागांना चांगली मागणी आली. त्यामुळे सेन्सेक्सची अधिक पडझड थांबली.