आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sensex Falls Over 272 Pts, Nifty Weak Tata Steel Drags 3 % News In Marathi

बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरण; सेन्सेक्स 272 अंकांनी कोसळला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. बाजार उघडताच सेन्सेक्स 272 अंकांनी खाली कोसळला. याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 81 अंकांनी खाली आला. सेन्सेक्स 271 अंकांनी घसरत 28497 अंकावर तर निफ्टी 81 अंकांनी घसरला असून 8599 अंकावर स्थिर झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सला जोरदार फटका बसला. बीएसईच्या मिडकॅप इंडेक्समध्ये एक टक्का, तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 0.6 टक्के घसरण आली. दुसरीकडे, बीएसईच्या सर्व प्रमुख इंडेक्स 'रेड मार्क'मध्ये दिसले. यासोबत रियल्टी, मेटल आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्सला सर्वाधिक फटका बसला.

गेल, डीएलएफ, टाटा पॉवर, टाटा स्टील, एम अॅण्ड एम आणि सेसा स्टरलाइट सारख्या दिग्गज शेअर्समध्ये 5-1.6 टक्क्यांपर्यंत घसरले. केर्न इंडिया, पीएनबी, ओएनजीसी, एसबीआय, बँक ऑफ बडोदा आणि एचयूएलसारख्या दिग्गज शेअर्समध्ये 1.5-0.3 टक्के तेजी दिसून आली.

मिडकॅप शेअर्समध्ये अपोलो टायर्स, फिनोलेक्स इंडस्ट्रीज, जे अॅण्ड के बॅंक, गुजरात पिपावाव आणि एम्टेक ऑटोच्या शेअर्सला 8.7-4.1 टक्के फटका बसला. स्मॉलकॅप शेअर्समध्ये गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स, नॅशनल पिरॉक्स, प्रिकॉल, सांघी इंडस्ट्रीज आणि राजलक्ष्मी इंडस्ट्रीजला सर्वाधिक 9.7-5 टक्के फटका बसला.

दरम्यान, गेल्या शुक्रवारी बाजाराचा सेन्सेक्स 133.06 अंकांनी कोसळला होता. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांतील मागील आठवडा सर्वांत वाईट ठरल्याचे विश्लेषकांनी म्हटले आहे.
विदेशी गुंतवणूकदारांकडून सातत्याने गुंतवणूक काढून घेण्याचे सत्र सुरू आहे. तसेच जागतिक पातळीवरही फारसे उत्साहवर्धक वातावरण नाही. या दुहेरी संकटाचा सामना शेअर बाजार करीत आहे.