आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाजारात तेजीचे वारे, सेन्सेक्स 206 अंकांनी वधारला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- डॉलरच्या तुलनेत रुपयाने केलेल्या शानदार कामगिरीमुळे गुंतवणूकदार खुश झाले. दलाल स्ट्रीटवर उत्साहाने खरेदी झाली आणि बाजारात तेजीचे वारे घुमले. सेन्सेक्सने 206.50 अंकांच्या कमाईसह 18519.44 पातळी गाठली. निफ्टी 63.30 अंकांनी वाढून 5,471.75 झाला. भेल समभागाने 8.1 टक्क्यांच्या वाढीसह तेजीचे नेतृत्व केले. टाटा पॉवर, जिंदाल स्टील यांतही चांगली तेजी आली.