आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेन्‍सेक्‍समध्‍ये 21 अंकांची वाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई । अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची दोन दिवसांची नाणेनिधी धोरण बैठक बुधवारी संपली. या बैठकीतून काय निष्पन्न होते याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे. त्याच्याच जोडीला आशियाई शेअर बाजारातील संमिश्र वातावरणामुळे बाजारात सावध व्यवहार झाले. तरीही 21 अंकांची वाढ होऊन सलग चौथ्या सत्रात सेन्सेक्सची कमान चढती राहिली.
सकाळी खालच्या पातळीवर उघडल्यानंतर सेन्सेक्स दिवसअखेर 21.20 अंकांनी वाढून 17,257.38 अंकांच्या पातळीवर बंद झाला. रिझर्व्ह बॅँकेकडून व्याजदरात कपात होण्याच्या आशेमुळे गेल्या चार सत्रात सेन्सेक्समध्ये 600 अंकांनी वाढ झाली आहे. तर निफ्टीचा निर्देशांक 11.50 अंकांनी घसरून 5240.50 अंकांच्या पातळीवर बंद झाला.
बाजारात भेल, टाटा पॉवर, स्टेट बॅँक, एचडीएफसीच्या समभागांना चांगली मागणी आली. परंतु कोल इंडिया, ओएनजीसी, हिरो मोटोकॉर्प, टीसीएस, टाटा स्टील या कंपन्यांच्या समभगांना फटका बसला. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी जुलै महिन्यात भांडवल बाजारात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्यामुळे बाजाराला दिलासा मिळाल्याचे बोनान्झा पोर्टफोलिओच्या वरिष्ठ संशोधक विश्लेषक निधी सारस्वत यांनी व्यक्त केले.