आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sensex Gains As Rate Cut Hopes Rise As Inflation Eases

सेन्सेक्सचे शतक, बाजार वधारला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महागाईचा दर मार्चमध्ये अनपेक्षितरीत्या सहा टक्क्यांच्या खाली आला. गेल्या 40 महिन्यांची नीचांकी पातळी गाठणा-या महागाईने व्याजदर कपातीच्या आशा पल्लवित केल्या. मुंबई शेअर बाजारात सोमवारी गुंतवणूकदारांनी बँकांच्या शेअर्सची जोरदार खरेदी केली. कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीने ऑइल आणि गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली. त्यामुळे सेन्सेक्सने 11.24 अंकांच्या उसळीसह तेजीचे शतक ठोकले. निफ्टीने 39.85 अंकांच्या कमाईसह 5,568.40 अंकाची पातळी गाठली.

महागाईने 40 महिन्यांत प्रथमच सहा टक्क्यांच्या खालची पातळी गाठली. आरबीआयकडून प्रमुख व्याजदरात कपातीची शक्यता वाढल्याने गुंतवणूकदारांच्या बँकांच्या शेअर्सवर उड्या पडल्या. तर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भावात घसरण झाली. यामुळे गुंतवणूकदारांनी तेल आणि वायू क्षेत्रातील समभागांच्या खरेदीचा धडाका लावला. तर सोन्याच्या भावात घसरणीचा फटका सोने व दागिने संबंधित समभागांना बसला.

आंतरराष्ट्रीय पातळीवर आशियातील प्रमुख बाजारात घसरण दिसून आली. तर युरोपातील बाजारात प्रारंभीच्या सत्रात घसरण होती. फ्रान्सचा कॅक निर्देशांक 0.76 टक्क्यांनी तर डॅक्स 0.64 टक्के आणि एफटीएसई 0.89 टक्क्यांनी घसरणीच्या पातळीवर होते. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 16 समभागांत घसरण तर 14 समभागांत तेजी होती. बाजारातील क्षेत्रीय निर्देशांकात संमिश्र कल दिसला. एफएमसीजी निर्देशांक 1.45 टक्के वधारला. त्याखालोखाल सार्वजनिक उद्योगांचा पीएसयू निर्देशांक 1.38 टक्के, बँकेक्स 0.96 टक्के वधारला. भांडवली वस्तू निर्देशांक 2.06 टक्क्यांनी तर मेटल निर्देशांक 1.21 टक्के घसरले. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी शुक्रवारी 28.59 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केल्याचे सेबीने म्हटले आहे.