आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sensex Gains Over 100 Points; Scales New Peak News In Marathi

सेन्सेक्स, निफ्टी सर्वोच्च स्थानी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विदेशी गुंतवणूकदार संस्थांच्या खरेदीच्या सपाट्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंद निर्माण झाला आहे. त्यातच व्याजदरात कोणतेही बदल न होण्याचा अंदाज आणि अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याची आशा याची या आनंदात आणखी भर पडून बाजारात झालेल्या तुफान खरेदीत सेन्सेक्सने आपला वाढता वाढता वाढे बाणा कायम ठेवत 22,214.37 अंकांची आणखी एक ऐतिहासिक उंची गाठली.

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने मधल्या सत्रात तर 22,307.74 अंकांची अत्युच्च पातळी गाठली होती. विशेष म्हणजे सेन्सेक्सने सलग चौथ्या दिवशी मधल्या सत्रात विक्रमी पातळीचा कळस गाठणे कायम ठेवले आहे. दिवसभरात सेन्सेक्स सकारात्मक पातळीत राहून दिवस अखेर 119.07 अंकांची वाढ नोंदवत 22,214.37 अंकांच्या कमाल पातळीवर बंद झाला. सेन्सेक्सच्या पाठोपाठ निफ्टीनेदेखील मधल्या सत्रात 6673.95 अंकांची ऐतिहासिक विक्रमी पातळी नोंदवली होती. दिवसअखेर निफ्टी 40.35 अंकांनी वाढून 6641.75 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

फ्युचर अँड ऑप्शनची मार्चमधील व्यवहारपूर्तीच्या अखेरच्या दिवशी नफेखोरी झाल्यामुळे बाजारात चांगली वाढ झाली; परंतु बाजाराला सध्याच्या स्थितीत आवश्यक असलेली करेक्शन निवडणुकांनंतरच येईल, असा अंदाज बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला.
आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून तेजीचे वारे : विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी खरेदीचा धडका लावल्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवसापासूनच बाजारात तेजीचे वारे वाहत आहेत. त्यामुळे सोमवारी सेन्सेक्सने पहिल्यांदा 22 हजार अंकांची विक्रमी पातळी गाठली. मंगळवारी सेन्सेक्समध्ये किरकोळ घसरण झाली; परंतु विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी 1,004.52 कोटी रुपयांच्या केलेल्या समभाग खरेदीच्या बळावर सेन्सेक्सने बुधवारी 22,095.30 आणि निफ्टीने 6,601.40 अंकांची आणखी एक विक्रमी पातळी गाठली.
व्याजदर संवेदनशील समभागांना मागणी : सोमवारी जाहीर होणार्‍या नाणेनिधी धोरणात व्याजदर जैसे थे राहणार असाच अंदाज असल्याने बाजारात व्याजदर संवेदनशील समभागांना जोरदार
मागणी आली.

यांनी कमावले
स्टेट बँक, भारती एअरटेल, हीरो मोटोकॉर्प, गेल इंडिया, एनटीपीसी, बजाज ऑटो, हिंदुस्तान युनिलिव्हर, रिलायन्स, ओएनजीसी, टाटा पॉवर, भेल, विप्रो.
यांनी गमावले
डॉ. रेड्डीज लॅब, एसएसएलटी, टाटा मोटर्स, सन फार्मा