आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्सचा दीड महिन्याचा नीचांक, रुपयाही आपटला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शू्न्य टक्क्यावर आलेल्या महागाईने सर्वसामान्यांना दिलासा दिला; पण ताे बाजाराला मिळू शकला नाही. भांडवलाचा आटत चाललेला आेघ आणि आैद्याेगिक उत्पादनाच्या खराब कामिगिरीमुळे बाजाराचा मूड गेला. त्यामुळे गुंतवणूकदारांनी माहिती तंत्रज्ञान, बहुराष्ट्रीय कंपन्या, बँका, तेल समभागांची विक्री केली. परिणामी सेन्सेक्स ३१ अंकांनी धरून २७,३१९.५६ अंकांच्या दीड महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला.

डाॅलरच्या तुलनेत रुपया ६२.९२ अशा अकरा महिन्यांच्या खालच्या पातळीवर गेल्यामुळेदेखील बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. प्रचंड चढ-उतारांच्या वातावरणात सेन्सेक्स विक्रीच्या प्रचंड ताणामुळे जवळपास २४५ अंकांनी घसरला हाेता.

आशियाई शेअर बाजारातील नरमाई आणि आैद्याेगिक उत्पादनात झालेली घट या दाेन्ही गाेष्टींनी बाजाराला दणका दिला; परंतु घाऊक महागाई नाेव्हेंबरमध्ये शून्य टक्क्यांवर आल्यामुळे बाजारात पुन्हा एकदा खरेदी सुरू झाली. त्यामुळे सेन्सेक्स २७,३९२.१० अंकांच्या कमाल पातळीवर गेला हाेता; परंतु नफारूपी विक्रीमुळे सेन्सेक्स िदवसअखेर ३१.१२ अंकांनी घसरून २७,३१९.५६ अंकांच्या पातळीवर बंद झाला. काही माेजक्या समभागांची खरेदी झाल्यामुळे बाजारातील घसरणीला लगाम बसण्यात मदत झाली.
गेल्या दाेन सत्रांमध्ये सेन्सेक्स ४८०.४२ अंकांनी घसरला आहे. राष्ट्रीय बाजारातील िनफ्टीचा िनर्देशांक ८२०० या महत्त्वाच्या पातळीच्या खाली जात ८१५२.५० अंकांच्या पातळीवर गेला; परंतु नंतरच्या सत्रात िनफ्टी ४.५० अंकांनी घसरून ८२१९.६० अंकांच्या पातळीवर बंद झाला.