आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपन्यांच्या निकालाने बाजारात जोरदार खरेदी, सेन्सेक्सचा पारा १४० अंकांनी चढला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विप्रोबरोबरच अन्य कंपन्यांच्या उत्साहवर्धक तिमाही आर्थिक निकालांमुळे बाजारात खरेदीचा जोर वाढला. त्यामुळे सलग तिस-या सत्रात सेन्सेक्सने तेजीची कमान कायम ठेवली. सेन्सेक्स १४० अंकांनी वाढून २८,२६२.०१ अंकांच्या पातळीवर बंद झाला.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २८,२४९.८४ अंकांच्या कमाल पातळीवर उघडला आणि दवसभरात २८,३३४.०६ अंकांच्या कमाल पातळीवर बंद झाला. पाच डिसेंबरनंतरची ही सर्वात कमाल पातळी आहे. गेल्या तीन सत्रांमध्ये सेन्सेक्सने ९१५ अंकांची वाढ नोंदवली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक ३६.९० अंकांनी वाढून ८५५०.७० अंकांच्या पातळीवर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी विप्रो या कंपनीने डिसेंबरअखेर संपलेल्या तिस-या तिमाहीत आठ टक्क्यांनी वाढ होऊन तो २१९२.८ रुपयांवर गेला. कंपनीच्या समभाग किमतीतही ५.२६ टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे बाजारात खरेदीचा जोर वाढला. पतवाढीला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने अनपेक्षितपणे केलेल्या व्याजदर कपातीमुळे बाजारात तेजीची धारणा निर्माण झाली आहे. रुपयादेखील डॉलरच्या तुलनेत बळकट होऊन मधल्या सत्रात ६१.५८ अशा दोन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर गेला.

डिसेंबरपर्यंत सेन्सेक्स जाणार ३३,५००
देशातील ढोबळ आर्थिक चित्र सकारात्मक होणार असून त्याचा परिणाम भांडवल बाजारावर होऊ शकतो. त्यामुळे डिसेंबरपर्यंत सेन्सेक्स ३३,५०० अंकांचे शिखर गाठू शकेल, असा अंदाज नोमुराने व्यक्त केला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा आर्थिक वातावरणात सुधारणांचे संकेत मिळू लागल्यामुळे भारतीय भांडवल बाजाराबाबत तेजीचा दृष्टिकोन ठेवण्यात आला असल्याचे जपानमधील म्हटले आहे. गेल्या वर्षात सेन्सेक्स ६,३२८.७४ अंकांनी वाढला, तर २८ नोव्हेंबरला त्याने २८,८२२.३७ कमाल पातळी गाठली होती.