आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेटिंग इफेक्ट, बाजारात तेजी; सेन्सेक्सची १५७ अंकांनी उसळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - स्टँडर्ड अँड पुअर या जागतिक मानांकन संस्थेने भारताच्या पतमानांकन उंचावल्यामुळे बाजाराच्या आनंदाला पारावार उरला नाही. स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, हिंदाल्को, टाटा स्टील, सन फार्मा यासह अन्य बड्या समभागांची तुफान खरेदी झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून बाजारात सुरू असलेल्या घसरणीला चाप बसला. खरेदीच्या पाठबळावर १५७ अंकांची उसळी घेत सेन्सेक्सने बाजारात पुन्हा तेजी आली.

सेन्सेक्स सकाळी २६२२०.४९ अंकांच्या पातळीवर उघडला, पण नंतर खरेदीच्या झंझावातामध्ये मधल्या सत्रातच सेन्सेक्सने २६,७२१.०३ अंकांच्या कमाल पातळीवर गेला. सेन्सेक्स दिवसअखेर १५७.९६ अंकांनी वाढून २६,६२६.३२ अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या तीन सत्रात सेन्सेक्स ७३८.३८ अंकांनी गडगडला होता. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक देखील ५७ अंकांनी वाढून ७९६८.८५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.

युरोप शेअर बाजारातील सकारात्मक वातावरण आणि रुपयाच्या मूल्यात झालेली सुधारणा यामुळे देखील बाजारात खरेदीचा जोर वाढल्याचे मत बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले, पण त्याहीपेक्षा स्टँडर्ड अँड पुअर या जागतिक पतमानांकन संस्थेने भारताच्या पतमानांकनात बदल करून तो नकारात्मक पातळीवरून स्थिर असा केल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ऑक्टोबर महिन्यातील डेरिव्हेटीव्हज व्यवहारांच्या पहिल्या दिवशी धातू आणि आरोग्य समभागांची चांगली खरेदी झाली. गेल्या दोन दिवसांपासून धातू समभागांना
मोठा फटका बसला होता.

टॉप गेनर्स
स्टेट बँक, अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, िहंदाल्काे, टाटा स्टील, सेसा स्टर्लाइट,जिंदाल स्टील अँड पॉवर, सन फार्मा,सिप्ला, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा माेटर्स, िरलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी,विप्रो.

टॉप लुझर्स
डॉ. रेड्डी, बजाज ऑटाे, भारती एअरटेल. गेल. हीराे माेटाेकाॅर्प, िहंद युिनलिव्हर, आयटीसी.