आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निर्देशांकात वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सकाळच्या सत्रात दीडशतक ठोकणा-या सेन्सेक्सला प्रॉफिट बुकिंगचा फटका बसला. बजाज ऑटो, एसबीआय, स्टर्लाइट आणि टाटा स्टील या समभागांची जोरदार विक्री झाल्याने तेजीला फटका बसला. दिवसअखेर सेन्सेक्स 47 अंकांनी वाढून 19,608.08 वर बंद झाला. ही आठवड्यातील उच्चांकी पातळी आहे. निफ्टीने 10.45 अंकांची वाढ नोंदवत 5932.95 ही पातळी गाठली.

सेन्सेक्सने मंगळवारची शतकी खेळी बुधवारी सकाळच्या सत्रात पुन्हा सुरू केली होती. मात्र नफेखोरीने या खेळीला लगाम घातला. बुधवारी दुस-या सत्रात दिग्गज समभागांच्या विक्रीचा दबाब सेन्सेक्सवर दिसून आल्याचे बोनान्झा पोर्टफोलिओचे विश्लेषक निधी सारस्वत यांनी सांगितले. पॉवर, मेटल, रिअल्टी
आणि भांडवली वस्तू समभागांची जोरदार विक्री झाली. आता बाजाराचे लक्ष घाऊक महागाई निर्देशांकाकडे लागले आहे.