आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sensex Has Returned 18% A Year In The Last Decade

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेन्सेक्सची सलग तिस-या आठवड्यात घसरगुंडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- औद्योगिक उत्पादनाची घसरगुंडी आणि किरकोळ महागाईत झालेल्या वाढीमुळे हिरमुसलेल्या गुंतवणूकदारांनी बाजारात सातत्याने केलेल्या नफारूपी विक्रीच्या मा-यात सेन्सेक्स 27 अंकांनीघसरून 19,468.15 अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या सलग तीन आठवड्यांत सेन्सेक्सची घसरगुंडी झाली आहे.


काही बड्या कंपन्यांकडून तिमाही आर्थिक निकालात झालेल्या सुमार कामगिरीचादेखील बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. बाजारात झालेल्या विक्रीच्या मा-यात प्रामुख्याने भांडवली वस्तू, ऊर्जा, स्थावर मालमत्ता, धातू आणि ग्राहकोपयोगी वस्तू समभागांवर ताण आला.


साप्ताहिक आधारावर सेन्सेक्सने 19,517.59 अंकांच्या कमाल पातळीवर गेला आणि नंतर तो 19,723.01 आणि 19,381.82 अंकांच्या पातळीत झुलल्यानंतर दिवसअखेर 26.62 अंकांनी घसरून 19,468.15 अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या तीन आठवड्यांत सेन्सेक्सने 635.38 अंकांची गटांगळी खाल्ली आहे.राष्‍ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 16.10 अंकांनी घसरून यंदाच्या वर्षातल्या 5887.40 अंकांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. गेल्या तीन सत्रांत निफ्टी 187.25 अंकांनी घसरला आहे.


निर्मिती आणि खाणकाम क्षेत्राच्या निरुत्साहजनक कामगिरीमुळे औद्योगिक उत्पादन डिसेंबर महिन्यात 0.6 टक्क्यांनी घसरले आणि भाजिपाला, खाद्यतेल, तृणधान्य तसेच प्रथिनयुक्त पदार्थांच्या किमती चढ्या राहिल्याने किरकोळ महागाई दराने 10.79 टक्के अशी दोन अंकी वाढ नोंदवली. याचा बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. केंद्रीय अर्थसंकल्पाची तारीख जवळ येत असल्याने गुंतवणूकदारांनी नफारूपी विक्री करण्यावर भर दिल्यामुळे बाजारात सातत्याने नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. बोनान्झा पोर्टफोलिओचे विश्लेषक निधी सारस्वत यांच्या मते औद्योगिक उत्पादनाने केलेली निराशा,महागाई कमी झाल्याने नजीकच्या काळात व्याजदर कपात होणार की नाही याबाबत अनिश्चिततेचे वातावरण आहे.