आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपयाच्या घसरणीने सेन्सेक्सला धक्का

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सोमवारी सकाळच्या सत्रात जोरदार बॅटिंग करत दीडशतकी वाटचाल करणा-या सेन्सेक्सची घसरत्या रुपयाने दांडी उडवली. दिवसअखेर सेन्सेक्स 11.48 अंकाच्या वाढीसह 19,441.07 वर बंद झाला. निफ्टी तीन अंकांच्या किरकोळ वाढीसह 5,878.00 या पातळीवर स्थिरावला.


आठवड्याची सुरुवात मोठ्या तेजीने करणा-या बाजाराला रुपयाच्या सर्वकालीन नीचांकाचा धक्का पचवता आला नाही. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांनी सेन्सेक्सची तेजी कशीबशी टिकवून धरण्यास मदत केली. आयटी शिवाय तंत्रज्ञान, एफएमसीजी आणि तेल व वायू क्षेत्रातील समभागांनी तेजीला बळ दिले. अमेरिकेतील रोजगारविषयक आकडेवारी अपेक्षेपेक्षा चांगली आल्याने. आशियातील प्रमुख बाजारात तेजी दिसून आली. हॉगकाँग, जपानि, सिंगापूर, तैवान आणि दक्षिण कोरियातील बाजार 0.18 ते 4.94 टक्के तेजीसह बंद झाले. युरोपातील प्रमुख बाजारात संमिश्र कल होता.


सेन्सेक्सच्या यादीतील आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, सन फार्मा, जिंदाल स्टील, मारुती आणि भेल या समभागांना विक्रीचा फटका बसला.


टॉप लुझर्स : जिंदाल स्टील, मारुती , आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, स्टरलाइट, भारती एरटेल, हिंदाल्को, सन फार्मा, टाटा पॉवर


रुपयाचा परिणाम
बाजारात सोमवारी अस्थैर्य दिसून आले. रुपयाच्या घसरÞणीचा मोठा परिणाम बाजारावर झाला. विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून निधी काढून घेतल्याने बाजार अस्थिर झाला.युरोपातील बाजारात मात्र चांगले वातावरण होते.
दीपेन शाह, रिसर्च प्रमुख, कोटक सेक्युरिटीज