मुंबई- मोदी सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजीचे वातावरण दिसत आहे. सेंसेक्सने 26 हजारांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. नॅशनल स्टाक एक्सचेंज अर्थात निफ्टीने 7,787.95 अंकांचा उच्चांक गाठला आहे. सकाळी बाजार उघडता सेंसेक्स 137.29 अंकांनी उसळून 26,099.35 अंकावर स्थीर झाला.
आयटी, विद्युत, कॅपिटल गुड्स, वाहन आणि रियल्टी शेअर्समध्ये तुफान तेजी दिसून आली.
तसेच निफ्टीच्या सेंसक्समध्ये 36.35 अंकांची वाढ दिसून आली. निफ्टीने 7,787.95 अंकाची रेकॉर्डब्रेक उच्चांक गाठला.
संसदेत सुरु असलल्या अर्थसंकल्पाचा सकारात्मक परिणानाम शेअर बाजारावर दिसत आहे. तसेच विदेश फंड्स आणि छोट्या गुंतवणूकदारां होणार्या लिलावामुळे बाजारात उत्साह संचारला असल्याचे सूत्रांनी सांगितले.