आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्सने पार केला 28 हजारांचा जादुई आकडा, आता प्रतिक्षा 30 हजारांची!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आज (बुधवारी) शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच तेजीच्या वाटेवर रुढ होत सेन्सेक्स नवा विक्रमी नोंदवला. सेन्सेक्सने 100 अंकांनी उसळी घेत 28 हजारांचा जादुई आकडा पार केला आहे. सेन्सेक्सची आजपर्यंतची ही सर्वोच्च कामगिरी आहे. सलग चौथ्या सत्रात सेन्सेक्सने सर्वोच्च आकडा गाठला आहे. शेअर बाजारात गुंतवणूकदारांना यंदा आतापर्यंत जवळापास 32 टक्के जास्त रिटर्न मिळाले आहे.

विश्लेषकांच्या मते, कच्च्या तेलाच्या (क्रुड ऑईल) किमती सातत्याने घसरत आहेत. या पार्श्वभूमीवर बाजारात तेजीचा माहोल निर्माण झाला आहे. तसेच आयसीआसीआय बँक, टीसीएस आणि सन फार्मा यासारख्या आघाडीच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आलेल्या तेजीमुळे सेन्सेक्सने नवा उच्चांक गाठला, असल्याचे विश्लेषकांनी मत वर्तवले आहे.

शेअर बाजारात भविष्यातही अशाच प्रकारच्या तेजीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ऑगस्ट 2015 पर्यंत सेन्सेक्स 30,310 चा सर्वोच्च आकडा गाठेल, असे संकेत ग्लोबल रेटिंग एजन्सी 'नोमुरा'ने दिले आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, या कारणांमुळे बाजारात संचारली तेजी....