आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स, निफ्टीचा नीचांक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - दलाल स्ट्रीटवर शुक्रवारी गुंतवणूकदारांनी विक्रीचा धडाका लावला. त्यामुळे सेन्सेक्स 113.79 अंकांनी घसरून 19,781.19 या तीन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आला. राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 35.85 अंकांनी घसरून 5998.90 असा सहा हजारांच्या पातळीखाली बंद झाला.

सकाळच्या सत्रात आयसीआयसीआय बँक, एअरटेल आणि टाटा मोटर्सच्या समभागांची जोरदार विक्री झाली. सर्वाधिक फटका टाटा मोटर्सला बसला. टाटा मोटर्सचा शेअर 4.36 टक्के घसरणीसह बंद झाला. भारती एअरटेलमध्ये 2.62 टक्के घसरण दिसून आली. जागतिक बाजारातील नकारात्मक कलामुळे विक्रीला अधिक जोर आल्याचे निरीक्षण कोटक सेक्युरिटीजचे संशोधक दीपेन शाह यांनी नोंदवले. ते म्हणाले, भारती एअरटेल आणि भेलने आर्थिक निकालाबाबत गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग केला. त्यातच बँकिंग समभागांच्या विक्रीची भर पडली आणि सेन्सेक्स घसरला.