मुंबई - अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर कमीच राहणार असल्याचा निर्वाळा देताच बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. किरकोळ गुंतवणूकदारांसह फंडांनी चौफेर खरेदी केली. जागतिक शेअर बाजारात संमिश्र कल होता. युरोप शेअर बाजारात झालेल्या चांगल्या वाढीचादेखील बाजारावर सकारात्मक परिणाम झाला.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३९०.४९ अंकांनी वाढून २६,६३७.२८ अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक ११७.८५ अंकांची झेप घेत पुन्हा ७९०० अंकांच्या पातळीवर गेला. दिवसअखेर निफ्टी ७९६०.५५ पातळीवर बंद झाला.