आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजीने बाजार उजळला;सेन्सेक्स, निफ्टी एक आठवड्याच्या उच्चांकावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ग्राहकोपयोगी वस्तू, एफएमसीजी आणि धातू कंपन्यांच्या समभागांतील चांगल्या खरेदीने शेअर बाजार तेजीने उजळला. गुरुवारी सलग दुस-या सत्रात तेजी आल्याने गुंतवणूकदार सुखावले. सेन्सेक्सने 49.71 अंकांच्या वाढीसह 20310.74 वर बंद झाला. निफ्टी 13.90 अंकांच्या कमाईसह 6036.30 वर स्थिरावला.
गेल्या तीन सत्रांत सेन्सेक्सने 101.48 अंकांची कमाई केली आहे. तत्पूर्वीच्या सहा सत्रांत सेन्सेक्स 1100 अंकांनी घसरला होता. एफएमसीजी क्षेत्रातील हिंदुस्तान लिव्हर आणि आयटीसी हे समभाग चमकले. ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू कंपन्यांच्या समभागांतही चांगली तेजी दिसून आली. धातूचे समभागही चमकले. टाटा स्टील, कोल इंडिया आणि हिंदाल्कोचे समभाग वधारले. आयसीआयसीआय बँक, एसबीआय, इन्फोसिस आणि टीसीएस या समभागातील विक्रीने बाजारातील तेजीला काही प्रमाणात लगाम बसला. आशियातील बहुतेक शेअर बाजारात तेजी दिसून आली. युरोपातही असेच चित्र होते. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 16 समभाग चमकले तर 14 समभाग घसरले.
टॉप गेनर्स : कोल इंडिया, टाटा पॉवर, हिंदुस्तान युनिलिव्हर, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती-सुझुकी, आयटीसी, एचडीएफसी बँक, विप्रो, हिंदाल्को, एनटीपीसी
टॉप लुझर्स : भेल, अ‍ॅक्सिस बँक, सिप्ला, टीसीएस, एसबीआय, एल अँड टी, गेल इंडिया, आयसीआयसीआय बँक.