आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स,निफ्टीचा उच्चांक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - धातू आणि बँक समभागांमध्ये आलेल्या तेजीमुळे सलग चौथ्या सत्रात बाजाराने आपली चढती कमान कायम ठेवली. खरेदीच्या पाठबळावर इंट्रा डे व्यवहारात निफ्टीने पहिल्यांदाच ८७०० अंकांची पातळी पार केली. सेन्सेक्सही ५२२ अंकांची उसळी घेत २८,७८४.६७ अंकांच्या कमाल पातळीवर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांनी आपापले सार्वकालीन उच्चांक गाठले.
सेन्सेक्सने २८ नोव्हेंबरचा २८,८२२.३७ चा विक्रम माेडत २८,८२९.२९ अंकांची नवी उच्चांकी पातळी गाठली; दिवसअखेर सेन्सेक्स ५२२.६६ अंकांनी वाढून २८,७८४.६७ अंकांच्या नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला. चार दिवसांत सेन्सेक्सने १,४३८ अंकांच्या वाढीची नोंद केली आहे. निफ्टी १४४.९० अंकांच्या वाढीनंतर ८६९५.६० या नव्या उच्चांकावर बंद झाला.

तेजीचे कारण : रिझर्व्ह बँकेने व्याजदरात केलेली कपात आणि काही बड्या कंपन्यांनी तिस-या तिमाहीत केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे तेजी आल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. चीनच्या अर्थव्यवस्थेत अपेक्षेपेक्षा झालेली चांगली वाढ, युरोप बाजारातील वाढ यामुळे या तेजीला बळकटी मिळाली.

या समभागांनी कमावले
एचडीएफसी, सेसा स्टरलाइट, टाटा स्टील, अॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, आयटीसी, हिंदाल्को, रिलायन्स एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक