आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स, निफ्टी पुन्हा नव्या शिखरांवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - युरोपियन सेंट्रल बँकेने (ईसीबी) मदतीचे पॅकेज जाहीर केल्याने शुक्रवारी जगातील बहुतेक शेअर बाजारांत तेजी दिसून आली. मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारातही खरेदीची लाट आली. त्यामुळे सेन्सेक्स २७२.८२ अंकांच्या कमाईसह २९,२७८.८४ वर पोहोचला, तर निफ्टीने ७४.२० अंकांच्या वाढीसह ८,८३५.६० अंकांचा सार्वकालीन उच्चांक नोंदवला. शेअर बाजारातील सर्व क्षेत्रीय निर्देशांकांत चांगल्या खरेदीमुळे तेजी आली व बाजाराने विक्रमी साप्ताहिक वाढ नोंदवली.

सेन्सेक्सच्या यादीतील ब्ल्यू चिप कंपन्यांच्या समभागांच्या खरेदीवर गुंतवणूकदारांचा जोर राहिला. त्यामुळे टाटा पॉवर, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, सिप्ला, लार्सनचे समभाग चमकले. ब्रोकर्सनी सांगितले, आगामी अर्थसंकल्पाकडून अपेक्षा आता उंचावल्या असून, सरकारची पावले त्या दिशेने पडत असल्याने गुंतवणूकदारांत उत्साह आहे. त्यामुळे खरेदीला उधाण आले आहे.