आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स पुन्हा 20 हजारांवर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- डेरिव्हेटिव्हज व्यवहारांची मुदत गुरुवारी संपल्यामुळे बाजारात गुंतवणूकदारांनी सावध व्यवहार करणे पसंत केले. तरीही रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयसीआयसआय बॅँकेच्या समभागांना चांगली मागणी आल्यामुळे 14 अंकांची वाढ नोंदवत सेन्सेक्स पुन्हा 20 हजार अंकांच्या पातळीवर गेला.

दिवसभरात 20,073.46 अंकांची कमाल आणि 19,964.64 अंकांची नीचांकी पातळी गाठल्यानंतर सेन्सेक्स दिवसअखेर 14.10 अंकांनी वाढून 20,005 अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या दोन सत्रांत 113 अंकांनी सेन्सेक्स गडगडला होता. रिझर्व्ह बॅँकेने केलेली व्याजदर कपात आणि आर्थिक वाढ कमी होण्याचा अंदाज पतधोरणात व्यक्त केल्यामुळे बाजारात नफारूपी विक्रीचा मारा होऊन मंगळवारी सेन्सेक्स 112.45 अंकांनी घसरला होता. राष्‍ट्री य शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 5.85 अंकांनी वाढून 6066.75 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

स्थावर मालमत्ता, ग्राहकोपयोगी वस्तू आणि रिफायनरी समभगांना चांगली मागणी आली. त्याचबरोबर नैसर्गिक वायूच्या किमती लवकरच दुपटीने वाढण्याची अपेक्षा बाजाराला वाटत असल्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ओएनजीसीच्या समभागांवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. बाजार सध्या ठरावीक पातळीत फिरत असून जानेवारीतील फ्यूचर आणि ऑ‍ प्शनच्या व्यवहारांची मुदत संपण्याअगोदर समभागांशी निगडित व्यवहार होत आहेत.

तिसºया तिमाहीत अपेक्षेपेक्षा कमी आर्थिक कामगिरी केल्यामुळे राष्‍ट्री यीकृत बॅँकांच्या समभागांना फटका बसला. आरबीआयच्या पतधोरण आढाव्यानंतर बाजाराला अद्याप पुढची दिशा मिळत नसल्याचे मत मोतीलाल ओस्वाल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष शुभम अगरवाल यांनी व्यक्त केले.