आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलग चौथ्या सत्रात शेअर बाजारात घसरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सलग चौथ्या सत्रात घसरण नोंदवत सेन्सेक्सने चार महिन्यांतील नवा नीचांक गाठला. सोमवारी सेन्सेक्स 12.45 अंकांच्या घसरणीसह 18,437.78 वर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 10.30 अंकांनी घसरत 5,542.95 या पातळीवर स्थिरावला. बाजारात आयटी शेअर्सची जोरदार विक्री झाली. टीसीएस, इन्फोसिस या समभागांना विक्रीचा फटका बसला. ‘बाजारातील निवडक समभागांत खालच्या पातळीवर खरेदी करण्यावर गुंतवणूकदारांनी भर दिला. मात्र, बाजारात नकारात्मक वातावरणाचा प्रभाव दिसून आला. औद्योगिक उत्पादन निर्देशांक व महागाईच्या आकडेवारीवर बाजाराचे लक्ष लागले आहे,’ असे मत बोनान्झा पोर्टफोलिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश गोयल यांनी व्यक्त केले. घसरत्या बाजारात काही समभागांनी चांगली कमाई केली. भेल या सार्वजनिक उद्योगाला यंदाच्या आर्थिक वर्षात चांगली कंत्राटे मिळाल्याच्या वृत्ताने हा शेअर 2.8 टक्क्यांनी वधारला. भारती एअरटेलचा शेअरमध्ये 3.90 टक्क्यांनी तेजी दिसून आली.