आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स २८ हजारांवरून परत, निफ्टीचा उच्चांक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपातीची आशा आणि मोदी सरकारकडून आर्थिक सुधारणेची पावले या अपेक्षेने शेअर बाजारात बुधवारी तेजी आली. सेन्सेक्सने प्रथमच २८ हजारी िशखराला गवसणी घातली. मात्र, नंतर झालेल्या विक्रीने सेन्सेक्सला ही पातळी राखता आली नाही. शेवटी सेन्सेक्स ५५.५० अंकांच्या वाढीसह २७,९१५.८८ वर बंद झाला, तर निफ्टी १४.१५ अंकांनी ८३३८.३० वर स्थिरावला, निफ्टीचा हा सार्वकालीन उच्चांक आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकार भूसंपादन, कामगार, विमा कायदा व तोट्यातील सरकारी उद्योग विक्रीचे संकेत दिल्यानंतर बाजारात नवा उत्साह आला. त्यातून झालेल्या खेरदीने बाजारात तेजी आली. त्यातच युरोपातील सकारात्मक कल आणि विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली जोरदार खरेदी यामुळे या तेजीला नवी धार आली व सेन्सेक्सने इंट्रा डे व्यवहारात २८ हजारांचे शिखर सर केले. कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीने गुंतवणूकदारांनी खरेदीवर भर दिला. आशियातील प्रमुख शेअर बाजारात संमिश्र वातावरण होते, तर युरोपातील प्रमुख बाजारात तेजी दिसून आली.
तेजीचे मानकरी
अ‍ॅक्सिस बँक, एसबीआय, डॉ. रेड्डीज लॅब, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक, भेल, एचयूएल, आयटीसी

आज बाजार बंद
गुरुनानक जयंतीनिमित्त शेअर बाजाराला आज (दि. ६) सुटी आहे. त्यामुळे बाजारात व्यवहार होणार नाहीत.

सुधारणा व तेलाची तेजी
अर्थमंत्र्यांकडून आर्थिक सुधारणेचे संकेत आणि कच्च्या तेलाच्या घसरणा-या किमती यामुळे गुंतवणूकदारांनी खरेदीचा मार्ग अवलंबला व बाजार वधारला.
दीपेन शहा, रिसर्च हेड, कोटक सेक्युरिटीज