आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेन्सेक्स 16 हजारांच्या खाली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एकीकडे चीनमधील उत्पादन क्षेत्राची मंदावलेली वाढ, तर दुसर्‍या बाजूला भारतीय अर्थव्यवस्थेची घसरलेली गाडी यामुळे चिंताग्रस्त झालेल्या बाजारात तुफान विक्रीच्या मार्‍यात सेन्सेक्स 253 अंकांनी गडगडून 16 हजार अंकांच्या खाली गेला. विक्रीच्या या तडाख्यात गुंतवणूकदरांना 91 हजार कोटी रुपयांचा फटका बसला.

बाजारात सकाळपासूनच नरमाईचे वातावरण होते. त्यामुळे कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स लगेच घसरून 15,965.16 अंकांच्या पातळीवर आला. आठवड्यातील ही सर्वात मोठी नीचांकी पातळी आहे. आशियाई आणि युरोप शेअर बाजार घसरण्याचा भांडवल बाजारावर नकारात्मक परिणाम झाला.

चीनच्या उत्पादन क्षेत्राने अपेक्षेपेक्षा कमी वाढ नोंदवल्याचा परिणाम होऊन आशियाई शेअर बाजार घसरला. युरोप शेअर बाजारातील मरगळीमुळे स्पेन आणि आयर्लंड बाजार गडगडले. जागतिक शेअर बाजारातील घसरणीचा धक्का ताजा असतानाच देशाच्या जीडीपीने गेल्या नऊ वर्षांतील नीचांक गाठत 5.3 टक्क्यांनी कमी वाढ नोंदवल्याचाही मोठा धक्का बाजाराला बसला.

भांडवली वस्तू, वाहन, रिफायनरी आणि माहिती तंत्रज्ञान निर्देशांकांना या विक्रीचा मोठा फटका बसला, पण त्याचबरोबर बँका, धातू, स्थावर मालमत्ता, सार्वजनिक उपक्रम, हेल्थकेअर निर्देशांकही घसरले.

चिनी अर्थव्यवस्थेची वाढ मंदावल्यामुळे आशियाई शेअर बाजारात नरमाईचे वातावरण निर्माण झाले. हाँगकाँग, सिंगापूर, तैवान, जपान, दक्षिण कोरिया शेअर बाजार गडगडले. दुसर्‍या बाजूला ग्रीस आणि स्पेन अर्थव्यवस्थांबद्दल चिंता निर्माण झाल्यामुळे युरोप शेअर बाजारातही नरमाईचे वातावरण होते. परिणामी फ्रान्स, र्जमनी, लंडन शेअर बाजारात घसरणीचा सूर होता.

टॉप लुझर्स
टाटा मोटर्स, एल अँड टी, रिलायन्स, स्टर्लाइट, मारुती, ओएनजीसी, एचडीएफसी बॅँक, जिंदाल स्टील, भेल, टाटा पॉवर, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, विप्रो, एनटीपीसी.

टॉप गेनर्स
एचडीएफसी, टीसीएस, स्टेट बँक, डीएलएफ, टाटा स्टील.