आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sensex Slide By 91 Points ,month's Lowest Record

सेन्सेक्समध्‍ये 91 अंकांनी घसरला, महिन्याचा नीचांक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विक्रीच्या मा-या त सलग चौथ्या सत्रात सेन्सेक्सची घसरण झाली. मंगळवारी आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयसीआयसीआय बँकेच्या समभागांची जोरदार विक्री झाल्याने सेन्सेक्समध्ये 91 अंकांनी घसरण झाली. दिवसअखेर सेन्सेक्स 19,659.82 या महिन्याच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 30.35 अंकांनी घटून 5,956.90 पातळीवर बंद झाला. निफ्टीचा हा तीन आठवड्यांचा नीचांक आहे.

मुंबई शेअर बाजारातील 13 पैकी 12 क्षेत्रीय निर्देशांकात विक्रीचा जोर दिसून आला. तर सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 19 कंपन्यांच्या समभागात मोठी घसरण झाली. भेल,भारती एअरटेल,स्टर्लाइट इंड., टाटा मोटर्स, आयटीसी, टाटा पॉवर, हीरो मोटोकॉर्प, आयसीआयसीआय बँक, जिंदाल स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि डॉ, रेड्डीज लॅब या समभागांना सर्वाधिक फटका बसला.