आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेन्सेक्स 153 अंकांनी घसरला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सरकारने थेट विदेशी गुंतवणुकीबाबत उदार धोरण जाहीर केल्यामुळे शुक्रवारी सकाळच्या सत्रात बाजारात उत्साह होता. मात्र, डॉलरच्या तुलनेत रुपयाने पुन्हा एकसष्टी ओलांडल्यामुळे बाजाराचा मूड गेला. दुपारच्या सत्रात झालेल्या जोरदार विक्रीमुळे सेन्सेक्स 153.17 अंकांनी घसरून 19,164.02 वर बंद झाला. निफ्टी 49.95 अंकांच्या घटीसह 5,677.90 पातळीवर स्थिरावला. सेन्सेक्समध्ये सलग आठव्या सत्रात घसरण झाली.

रुपयाच्या घसरणीमुळे रिअँल्टी, ऊर्जा, धातू, सार्वजनिक उद्योग, भांडवली वस्तू, एफएमसीजी आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांची जोरदार विक्री झाली. नॅशनल स्पॉट एक्स्चेंजमधील व्यवहारावर बंदी आल्याचा सर्वाधिक फटका फायनान्शियल टेक्नॉलॉजीज लिमिटेडला बसला. त्याचे समभाग 21.12 टक्के घसरणीसह 151.25 वर बंद झाले.

सेन्सेक्सच्या यादीतील 24 समभाग घसरले. जिंदाल स्टील, कोल इंडिया, टाटा पॉवर, स्टरलाइट इंडस्ट्रीज, टाटा स्टील, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, डॉ. रेड्डीज लॅब , महिंद्रा हे समभाग गडगडले.