आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sensex Surges 174 Points, Nifty Reclaims 8600 mark

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धोरणावर बाजार नाराज : सेन्सेक्स १२२ अंकांनी आपटला, निफ्टीत घट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिझर्व्ह बँकेने प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवल्याने नाराज झालेल्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी शेअर बाजारात विक्रीवर भर दिला. परिणामी, सेन्सेक्स १२२.१३ अंकांनी घसरून २९०००.१४ वर बंद झाला. निफ्टी ४०.८५ अंकांच्या घसरणीसह ८,७५६.५५ या पातळीवर स्थिरावला.

रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात प्रमुख दर जैसे थे ठेवण्यात आले. त्यामुळे नाराज गुंतवणूकदारांनी नफा पदरात पाडून घेणे पसंत केले. विशेष म्हणजे व्याजदर कपातीच्या आशेने सेन्सेक्स सकाळच्या सत्रात १३० अंकांनी उसळला होता.