Home | Business | Share Market | sensex survives global scare...sun tv, spicejet plunge

सेन्सेक्सच्या दोन दिवसीय तेजीला अखेर ब्रेक

agency | Update - Jun 03, 2011, 03:56 AM IST

अमेरिकेतील मंदावलेले औद्योगिक उत्पादन तसेच रोजगार आकडेवारीने निराश झालेल्या गुंतवणूकदारांनी केलेल्या नफारूपी विक्रीमध्ये सेन्सेक्स ११४ अंकांनी घसरला.

  • sensex survives global scare...sun tv, spicejet plunge

    मुंबई - अमेरिकेतील मंदावलेले औद्योगिक उत्पादन तसेच रोजगार आकडेवारीने निराश झालेल्या गुंतवणूकदारांनी केलेल्या नफारूपी विक्रीमध्ये सेन्सेक्स ११४ अंकांनी घसरला. अन्नधान्याच्या चलनवाढीत झालेली काहीशी घसरण बाजाराला दिलासा देणारी ठरली.
    अमेरिकेतील औद्योगिक उत्पादनातील घट आणि रोजगारविषयक अहवालाचा परिणाम सर्वच शेअर बाजारांवर झाला. आशियाई शेअर बाजार जवळपास तीन दिवसांनंतर पहिल्यांदाच घसरला. मुंबई शेअर बाजारावरही याचा परिणाम झाला. गेल्या दोन सत्रांपासून ३७६ अंकांनी वधारलेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक नफारूपी विक्रीनंतर ११४.६३ अंकांनी घसरून १८,४९४.१८ अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकही ४१.६५ अंकांनी घसरून ५,५५.३५ अंकांच्या पातळीवर बंद झाला. किंचितशा घसरलेल्या अन्नधान्याच्या चलनवाढीमुळे बाजारातील घसरणीला काहीसा लगाम बसण्यास मदत झाली; परंतु चलनवाढ अद्यापही स्वीकारार्ह पातळीच्या बाहेर असल्यामुळे रिझव्र्ह बँक पुन्हा एकदा व्याजदरात वाढ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भीतीमुळे बँकांच्या समभागांची जास्त विक्री झाली. त्याबरोबर धातू समभागांनाही फटका बसला.
    सन टीव्ही, स्पाइस जेटचे समभाग गडगडले - नवी दिल्ली टू-जी स्पेक्ट्रम घोटाûयाप्रकरणी सादर करण्यात आलेल्या जनहित याचिकेमध्ये केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री दयानिधी मारन यांचे नाव घेण्यात आले आहे. गुन्हा अन्वेषण विभागाने त्यांची प्राथमिक चौकशी सुरू केली असल्याचे वृत्त शेअर बाजारात येताच मारन यांच्या सन टीव्ही प्रसारण कंपनीचे समभाग ३१ टक्क्यांपेक्षा जास्त गडगडले.
    सन टीव्हीच्या समभाग किमतीत २९.७८ टक्क्यांनी घसरण होऊन ती २६५ रुपयांवर आली. दयानिधी मारन यांचे बंधू कलानिथी मारन यांच्या मालकीच्या असलेल्या स्पाइस जेटलाही फटका बसला. स्पाइस जेटचा समभाग ४ ते ४५ रुपयांवर उघडला. त्यानंतर हा समभाग १२ ते १६ टक्क्यांनी घसरून ३६.१ रुपयांवर आला.

Trending