आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्‍सेक्‍सचा दोन वर्षांचा उच्‍चांक, निर्देशांक पुन्‍हा 20 हजारांवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्‍सेक्‍सने आज दोन वर्षांमधील उच्‍चांकी पातळी गाठली. सेन्‍सेक्‍स आज 20124 या उच्‍चांकी पातळी पोहोचला. तेल आणि नैसर्गिक वायु क्षेत्रातील कंपन्‍यांच्‍या शेअर्समध्‍ये आज मोठी खरेदी बघायला मिळाली. त्‍यामुळे बाजार उघडल्‍यानंतर सेन्‍सेक्‍सने 123 अंकांची उसळी घेतली.

काही दिवसांपूर्वीच निर्देशांकाने गेल्या दोन वर्षांमध्ये पहिल्यांदाच 20 हजार अंकांचा टप्पा गाठला होता. आज राष्‍ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही 36 अंकांनी वर उघडला. सध्‍या निफ्टीही 6 हजार अंकांच्‍या वर आहे. बाजारामध्‍ये सध्‍या तेजीचे वातावरण असून गुंतवणूकीसाठी चांगली संधी असल्‍याचे जाणकारांचे मत आहे. सरकारने डिझेलच्‍या किंमतीवरील नियंत्रण हटविल्‍यानंतर ऑईल कंपन्‍यांच्‍या शेअर्समध्‍ये तेजी दिसून आली. ओएनजीसीचे शेअर्स 10.68 टक्‍के, आरआयएलचे शेअर्स 7.65 टक्‍क्‍यांनी वाढले. तर इंडियन ऑईलच्‍या शेअर्समध्‍ये 10 टक्‍क्‍यांची वाढ नोंदविण्‍यात आली.