आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी वंदू तेजीला : सेन्सेक्स स्थिर; रुपया सावरला, सोने स्वस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गणरायाच्या आगमनाला पावसाने जशी सलामी दिली तशीच तेजीची सलामी भांडवल बाजारानेही दिली. सेन्सेक्सने इंट्रा डे व्यवहारात 20 हजारांचा टप्पा ओलांडला. रुपयाकडून डॉलरची धुलाई सलग पाचव्या सत्रात सुरूच राहिली. सराफा बाजारात सोने तसेच चांदी स्वस्त झाल्याने गौरी-गणपतीच्या मुहूर्तावर दागिने खरेदी करणार्‍यांना दिलासा मिळाला. सर्वत्र फील गुडचे वातावरण असल्याचे सुखद चित्र बुधवारी बाजारात दिसले.